श्रीगोंद्यात आठ वर्षीय चिमुरडीवर अत्याचार,गुन्हा दाखल होवू न देण्यासाठी नातेवाईकावर दबाव.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- श्रीगोंदा तालुक्यातील एका गावात आठ वर्षीय चिमुरडीवर एका नराधमाने अत्याचार केल्याची घटना घडली आहे. मात्र संबंधितावर गुन्हा दाखल होऊ नये. यासाठी गावपातळीवरील काही पुढारी प्रयत्न करत आहेत. त्यामुळे याबाबत अद्याप कुठल्याही प्रकारचा गुन्हा दाखल झाला नाही. 


Loading...
याबाबत सविस्तर असे की, तालुक्यातील एका गावात एक आठ वर्षीय चिमुरडी घराच्या अंगणात खेळत असताना, गावातीलच एका नराधमाने तिला बाजूला नेऊन तिच्यावर अत्याचार केला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर संबंधित नराधमावर गुन्हा दाखल होऊ नये. यासाठी पुढाऱ्यांनी आपापली यंत्रणा राबवली. 

काहींनी तर पीडित मुलीच्या नातेवाईकावर दबाव टाकला. ही घटना तीन दिवसांपूर्वी घडली आहे.मात्र संबधित पोलिस ठाण्यातील अधिकाऱ्याकडे याबाबत विचारणा केली असता. त्यांनी आमच्याकडे कसलीही फिर्याद अगर तक्रार अर्ज दाखल नसल्याचे सांगत आपले हात झटकले. 


मात्र हा गंभीर प्रकार असताना तो दाबण्याचा नेमका कोण प्रयत्न करत आहे. पोलिस अशा प्रकारची घटना समजूनही स्वत: कारवाई का करत नाहीत. असे एक ना अनेक प्रश्न यानिमित्त निर्माण झाले आहेत.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.