पारनेर तालुक्यात एसटीच्या धडकेने महिला जखमी.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- पारनेर तालुक्यातील भाळवणी येथील आमले वस्तीजवळ रस्ता ओलांडत असताना एसटी बसची धडक बसल्याने वस्तीवरील महिला जखमी झाली.


Loading...
याविषयी सविस्तर माहिती अशी की, मंगळवारी सायंकाळी पावणेसहाच्या दरम्यान कल्याणहून नगरकडे जात असलेल्या एम. एच. २० बी. एल. ४०४८ या बसची आमले वस्तीवरील सौ. राधाबाई सदाशिव आमले (वय ६०) या महिलेला रस्ता ओलांडत असताना धक्का लागल्याने ही महिला जखमी झाली. या महिलेला उपचारासाठी नगर येथे हलविण्यात आले आहे. 
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.