जामखेडमध्ये भरदिवसा जबरी चोरी अडीच लाखांचा ऐवज लंपास.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- जामखेड शहरातील मराठी शाळेमागील दत्तनगर भागात सोमवार दुपारी दोनच्या सुमारास घरफोडी होऊन अडीच तोळे सोने व रोख ७० हजार रुपये अज्ञात चोरांनी लंपास केले आहेत. दिवसाढवळ्या झालेल्या घरफोडीमुळे शहरात चांगलीच खळबळ उडाली आहे. 
Loading...

विशेषत: हे ठिकाणी पोलीस स्टेशनपासून जवळच आहे. .गेल्या पंधरा दिवसांपासून शहरात घरफोड्यांचे सत्र सुरूच आहे. शहरातील स्टेट बँक व तालुक्यातील पिंपरखेड, धोत्री, या परिसरातील झालेल्या चोऱ्यांचा तपास अद्याप लागला नाही. तोच पुन्हा भरदुपारी चोरी झाली आहे. यामुळे शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांच्या पुढे चोरी रोखण्याचे मोठे आव्हान आहे.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.