श्रीगोंद्यातील शेतकऱ्याच्या आत्महत्येप्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- श्रीगोंदा शहरातील कापसेवस्ती बंधाऱ्याजवळ राहाणारे अनिल कृष्णाजी गाडेकर. या शेतकऱ्याने सोमवारी दि.३ घराजवळील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली होती. या घटनेबाबत आधी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. 

Loading...
परंतु सोमवारी दि.३ रोजी रात्री उशिरा मयत गाडेकर यांचे बंधू गणपत गाडेकर यांनी मयत अनिल गाडेकर यांच्या जवळ सापडलेल्या चिट्ठीच्या आधारे आदीक्षा ऊर्फ आदिक येळकाण्या काळे रा.वडाळी या खाजगी सावकारासह मयत गाडेकर यांचा मित्र भाऊ बबन कोथिंबीरे रा.कोथिंबीरे मळा, श्रीगोंदा या दोघांविरोधात श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत सविस्तर असे की, मयत अनिल गाडेकर यांनी वडाळी येथील आदिक काळे याच्याकडून डिसेंबर २०१७ मध्ये घरखर्च व कर्ज फेडण्यासाठी एक एकर शेतीचे आकरा महिन्यांसाठी गहाणखत करून देत. दोन लाख रुपये ५ टक्के व्याजदराने घेतले होते.

परंतु आदिक काळे हा ८ टक्के एवढ्या वाढीव व्याजदराने गाडेकर यांना पैसे परत मागत होता. तसेच गाडेकर यांनी ते पैसे त्यांचा मित्र भाऊ कोथिंबीरे याला त्याची अडचण असल्यामुळे दिले होते. पण काही दिवसांपासून भाऊ कोथिंबीरे गावात दिसत नव्हते व त्यांचा संपर्कही होत नव्हता. 

त्यामुळे गाडेकर प्रचंड अस्वस्थ झाले होते. तसेच मागील तीन दिवसांपूर्वी वडाळी येथील आदिक काळे हा मयत अनिल गाडेकर यांच्या घरी येऊन गाडेकर यांना तू माझे पैसे दे, नाहीतर मी तुझा जीव घेईन, तू मला ओळखले नाहीस. असे म्हणून शिवीगाळ करत दम दिला होता.

त्यामुळे मित्राने पैसे घेऊन केलेली फसवणूक व खाजगी सावकाराचा वाढीव व्याजदराने पैसे परत करण्यासाठी लावलेला तगादा. या गोष्टीतून मानसिक त्रास झाल्यामुळेच अनिल गाडेकर यांनी आत्महत्या केल्याचे त्यांच्याजवळ सापडलेल्या चिट्ठीत आढळून आले. त्यामुळे मयत गाडेकर यांचे बंधू गणपत गाडेकर यांनी वरील दोन्ही व्यक्तींविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.