केडगावच्या अंबिका पतसंस्थेत दोन कोटी रुपयांचा अपहार,कोतकर या पिता-पुत्रांसह १८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- केडगाव येथील अंबिका ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेत सुमारे २ कोटी १३ लाख रुपयांचा अपहार झाल्याचे उघडकीस आले आहे. लेखा परीक्षणात ही बाब समोर आली आहे. याप्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात पतसंस्थेचे अध्यक्ष सर्जेराव कोतकर, नगरसेवक सुनिल सर्जेराव कोतकर या पिता-पुत्रांसह १८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. 

Loading...
गेल्या काही महिन्यापासून ही पतसंस्था बंद होती. दरम्यान अंबिका पतसंस्थेतील अपहारामुळे केडगावसह नगर शहर व उपनगरातील ठेवीदारांमध्ये एकच खळबळ उडाली असून हा चर्चेचा विषय झाला आहे. या प्रकरणी लेखा परिक्षक शिरीष देविदास कुलकर्णी यांच्या फिर्यादीनुसार गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. 

याबाबत पोलिस सुत्रांनी श्री. कुलकर्णी यांच्या फिर्यादीनुसार दिलेली माहिती अशी की, केडगाव येथील अंबिका ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेत अनेकांनी लाखो रुपयांच्या ठेवी ठेवल्या आहेत. त्या ठेवी परत मिळाव्यात अशा प्रकारची मागणी ठेवीदारांनी केली होती. 

मात्र, त्यांच्या ठेवी मिळत नव्हत्या. म्हणूनच अनेक ठेवीदारांनी गेल्या वर्षभरापासून तक्रारी केल्या होत्या. ठेवीदारांच्या ठेवीबाबत संचालक व व्यवस्थापनाकडूनही ठेवीदारांना समाधानकारक उत्तरे मिळत नव्हते. संस्थेचे लेखा परिक्षण शिरीष देवीदास कुलकर्णी यांनी केले. 

लेखा परिक्षणा अंबिका पतसंस्थेत दोन कोटी रुपयांचा अपहार झाल्याची बाब समोर आली. त्यानुसार कुलकर्णी यांनी रितसर कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. दरम्यान अपहराच्या घटनेमुळे केडगावमध्ये खळबळ उडाली असून हा चर्चेचा विषय झाला आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.