साईभक्तांच्या सुविधेसाठी शिर्डी विमानतळावरून दिल्ली, बंगळूरूसाठी विमानसेवा


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- शिर्डी विमानतळावरुन सुरु करण्यात आलेल्या मुंबई व हैद्राबाद या दोन विमानसेवांना साईभक्तांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याने आता दिल्ली व बंगळूरू येथील प्रवाशांसाठी येत्या २० सप्टेंबरपासुन दिल्ली व १ ऑक्टोबरपासुन बंगळूरू या शहरांसाठी विमानसेवा सुरु करण्यात येणार आहे. 
Loading...

साईभक्तांच्या सुविधेसाठी शिर्डीपासुन १२ किलोमीटर अंतरावर काकडी परिसर येथे उभारण्यात आलेल्या साईबाबा आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमान उड्डाणांची यशस्वी चाचणी केल्यानंतर गेल्या वर्षी १ ऑक्टोबरला विजयादशमीच्या मुहुर्तावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते विमानसेवेचा शुभारंभ करण्यात आला. त्यानंतर या विमानतळावरुन शिर्डी-मुंबई व शिर्डी-हैद्राबाद अशी विमानसेवा सुरु करण्यात आली. 


यास भाविकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. भाविकांचा विमानसेवेस मिळणारा प्रतिसाद लक्षात घेता १२ विमान कंपन्यांनी शिर्डीसाठी विमानसेवा सुरु करण्यासाठी परवानगी मागितली होती. त्यांना आता विमान प्राधिकरणाने परवानगी दिली आहे. 


येत्या डिसेंबरपासुन आणखी दहा विमान कंपन्यांची सेवा सुरु करण्यात येणार आहे. दिल्ली व बंगळूरू येथील भाविकांची विमानसेवेसाठी मोठ्या प्रमाणात मागणी वाढली होती. त्या पार्श्वभूमीवर येत्या २० सप्टेंबर पासुन दिल्ली-शिर्डी-दिल्ली ही विमानसेवा सुरु केली जाणार आहे.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.