तृप्ती देसाईना हवे शनिशिंगणापूर देवस्थानचे अध्यक्षपद !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- शनी शिंगणापूर देवस्थान सरकारने तात्काळ ताब्यात घ्यावे व मुख्यमंत्र्यांनी भूमाता ब्रिगेड संघटनेला अध्यक्षपद देऊन महिलेला अध्यक्ष करण्याची परंपरा चालू ठेवावी अन्यथा राज्यात मोठे आंदोलन करण्यात येईल. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचे भूमाता रणरागिणी ब्रिगेड तृप्ती देसाई यांनी शनी शिंगणापूर येथे बोलताना सांगितले. 


Loading...
महिलेला अध्यक्ष करण्याची परंपरा चालू ठेवावी अन्यथा राज्यात मोठे आंदोलन करण्यात येईल. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचे भूमाता रणरागिणी ब्रिगेड तृप्ती देसाई यांनी शनी शिंगणापूर येथे बोलताना सांगितले. 

तृप्ती देसाई यांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत मंगळवार, दि.४ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजता शनी शिंगणापूरात आल्या व शनी चौथऱ्यावर जाऊन त्यांनी दर्शन घेतले. मंदिर परिसरात माध्यमांशी बोलताना तृप्ती देसाई यांनी सांगितले की,संपूर्ण राज्यातील मंदिरात दर्शनासाठी समानता असावी याकरिता मोठे आंदोलन केले होते. 


त्याची सुरवात शनी शिंगणापूरपासून केली होती. आमच्या आंदोलनामुळे देशातील महिलांना शनी चौथऱ्यावर जाऊन दर्शन घेण्याचा हक्क मिळाला. तसेच राज्यातील अनेक मंदिरातील विविध प्रश्नांसाठी आमची संघटना लढत आहे. मंदिरात महिला पुजारी नेमावे, दर्शन व्यवस्थेत समानता यावी यासाठी आमचा लढा चालू आहे. 


शनी शिंगणापूर देवस्थान सरकारने ताब्यात घेऊन सुमारे २ महिने झाले आहे. तरीही अजून जुनेच विश्वस्त मंडळ काम पाहत आहे. सध्याचे अध्यक्ष व विश्वस्त मंडळ यांना कुठलेही धोरणात्मक निर्णय घेण्याचा अधिकार नाही. मग सरकार नवीन विश्वस्त मंडळ का निवडत नाही. 


नवीन विश्वस्त मंडळ निवडताना सरकारने सामाजिक कार्य करणाऱ्या व्यक्तींना येथे स्थान द्यावे. राजकिय लोकांना विश्वस्त मंडळात स्थान दिल्यास आमच्या संघटनेमार्फत आंदोलन करण्यात येईल, असा इशारा तृप्ती देसाई यांनी दिला आहे.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.