...तर मुलीला पळवून आणण्यास मदत करीन - भाजपा आमदार राम कदम


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :देशात एकीकडे 'बेटी बचाव, बेटी पढाव' अशी मोहीम सत्ताधारी भाजपा राबवत असतानाच याच पक्षाचे मुंबईतील आमदार राम कदम यांनी जाहीरपणे केलेल्या वक्तव्याने नवा वाद उद्भवला आहे. 'तुम्हाला आवडणाऱ्या मुलीला पळवून आणण्यासाठी १०० टक्के मदत करीन,' असे जाहीर वक्तव्य राम कदम यांनी केले आहे. 


Loading...
यामुळे विरोधी पक्षांनी जोरदार टीकास्त्र सोडले आहे. मुंबईतील घाटकोपर विधानसभा मतदारसंघाचे आमदार राम कदम यांनी आयोजित केलेल्या दहीहंडी उत्सवात, 'तुम्ही एखाद्या मुलीला प्रपोज केले असेल आणि ती नाही म्हणत असेल तर तुमच्या पालकांसह माझ्याकडे या. मी १०० टक्के मदत करीन. तिने तुमच्याशी लग्न करावे यासाठी त्या मुलीला पळवूनही आणेन. कोणतेही काम असेल तर मला भेटा,' असे जाहीर वक्तव्य केले. त्यांच्या या वक्तव्याचा व्हिडीओ राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटरवर पोस्ट केला आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.