इच्छुकांच्या खिशाला गणपती वर्गणीमुळे मोठी कात्री.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-  महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यास गुडघ्याला बाशिंग बांधून तयार असलेल्या इच्छुकांच्या खिशाला गणपती वर्गणीमुळे मोठी कात्री लागली आहे. प्रभागातील लहान-मोठ्या सार्वजनिक गणेश मंडळांना वर्गणी देताना इच्छुक उमेदवाराच्या नाकीनव येत आहेत. 


Loading...
वर्गणी मागण्यासाठी आलेल्या मंडळांकडून त्यांना तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करावा लागत आहे. गणेशोत्सवाच्या स्वागतासाठी नगरकर सज्ज झाले असून सार्वजनिक गणेश मंडळांच्या उभारणीचे काम सुरू आहे. मोठ्या मंडळांना लाखोंचा, तर लहान मंडळांना हजाराेंचा खर्च करावा लागतो. 

त्यासाठी प्रत्येक मंडळ सध्या वर्गणी मागताना दिसत आहे. त्यात महापालिका निवडणूक रिंगणात उतरणाऱ्या इच्छुक उमेदवारांकडून सर्वाधिक वर्गणी वसूल केली जात आहे. निवडणूक लढवायची, तर खर्च आलाच, असे म्हणत हे इच्छुक वर्गणीला नाही म्हणत नाहीत. 


परंतु वर्गणी देताना ते घासाघीस करताना दिसत आहेत. विद्यमान नगरसेवकांनी गणेशोत्सवाच्या महिनाभर आधीच वर्गणीचा निधी वेगळा काढून ठेवला. प्रभागातील सर्व मंडळांना कमीत कमी ७० हजार रुपयांची वर्गणी द्यावी लागते.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.