राहाता शहरातील राधाकृष्ण विखे व्यापारी संकुलात चोऱ्या.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-  राहाता शहरातील मोबाइल व रेडिमेड कपड्याचे दुकान फोडून चोरट्यांनी ७३ हजार १०० रुपयांचा ऐवज लांबवला. रविवारी मध्यरात्री चितळी रस्त्यावरील राधाकृष्ण विखे व्यापारी संकुलात या चोऱ्या झाल्या.


Loading...
गोल्डन मोबाइल शाॅपीचे मालक तन्वीर निजाम तांबोळी हे सोमवारी सकाळी दुकान उघडण्यासाठी आले असता चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांच्याकडे दुरुस्तीसाठी आलेले ४१ हजार १०० रुपये किमतीचे सॅमसंग, सोनी व मायक्रोमॅक्स कंपनीचे मोबाइल हॅण्डसेट, तसेच या दुकानाशेजारील सुमित फॅशन वर्ल्ड या रेडिमेड कपड्याच्या दुकानाचे शटर उचकटून जीन्सच्या ६० पँट, ५० शर्ट, २० टी शर्ट असे ३२ हजारांचे कपडे चोरांनी नेले.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.