पोलिस ठाण्यात आदिवासी महिलेने घेतले विष.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-  काष्टी येथील नाजुकी भोसले (२५ वर्षे) या आदिवासी महिलेने सोमवारी पोलिस ठाण्याच्या आवारात विषप्राशन केले. पोलिसांनी या महिलेला तातडीने ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. नाजुकी भोसले या हिने तिच्या भावाच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. ती मागे घेण्यासाठी तो तिच्यावर दबाव टाकत आहे. 
Loading...
पोलिस त्याच्यावर कारवाई करत नाहीत, म्हणून तिने विषारी औषध प्राशन करून आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले. पोलिसांनी तिला ग्रामीण रुग्णालयात दाखल केल्यावर पुढील उपचारांसाठी नगर येथील जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले. पोलिसांकडे याबाबत विचारणा केली असता या महिलेच्या तक्रारीवरून संबंधिताच्या विरोधात आम्ही कारवाई केली आहे, असे सहायक पोलिस निरीक्षक नीलेश कांबळे यांनी सांगितले.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.