श्रीगोंद्यात कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- श्रीगोंदे शहरातील कापसेवस्ती बंधारा, पठाणबाबा दर्गा येथे राहणारे अनिल कृष्णाजी गाडेकर (५२) यांनी सोमवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घराजवळ असलेल्या लिंबाच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. कर्जबाजारीपणाला कंटाळून गाडेकर यांनी आत्महत्या केल्याचे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले. 

Loading...
गाडेकर यांच्यावर सोसायटीचे तीन लाख रुपयांचे कर्ज होते. सरकारच्या कर्जमाफी योजनेचा लाभ मिळण्यासाठी गाडेकर यांनी खासगी सावकाराकडून दोन लाख रुपये कर्ज काढून सोसायटीचे कर्ज भरले. परंतु त्यांना सरकारच्या कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही. 

खासगी सावकाराच्या कर्जाचे व्याज वाढत गेले. त्याला कंटाळूनच गाडेकर यांनी आपली जीवनयात्रा संपवल्याची माहिती मृत गाडेकर यांच्या नातेवाईकांनी दिली. याप्रकरणी मृताचे भाऊ गणपत कृष्णाजी गाडेकर यांनी श्रीगोंदे पोलिस ठाण्यात दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.