टॅंकरच्या धडकेत दुचाकीवरील सेवानिवृत्त प्राध्यापक जागीच ठार.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- नगर-मनमाड महामार्गावर पत्रकार चौकाजवळील ओबेरॉय हॉटेलसमोर टॅकरने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात सारोळा कासार येथील सेवानिवृत्त प्राध्यापक मधुकर रंगनाथ धामणे (वय ७५) हे जागीच ठार झाले आहेत. हा अपघात रविवारी (दि.२) दुपारी ४.३० वाजण्याच्या सुमारास झाला.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, नगर-मनमाड महामार्गावर ओबेरॉय हॉटेलसमोर दुचाकीला टॅकरने जोराची धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की यामध्ये दुचाकीवरील मधुकर धामणे यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातामुळे रस्त्यावर रक्ताचा सडा पडला होता. 


Loading...
या अपघातामुळे महामार्गावर मोठया प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. नगरसेवक दिलीप सातपुते हे घटनास्थळाजवळून जात असताना त्यांना टॅकरने दुचाकीस्वाराला धडक दिल्याचे समजताच त्यांच्यासह नागरिकांनी टॅकर थांबवून त्याची चावी काढून घेतली. 

दुचाकीवरील चालकाच्या अंगावरुनच टॅकर गेल्याने त्यांनी तात्काळ रुग्णवाहिकेशी तसेच पोलिस प्रशासनाशी संपर्क साधला. बराच काळ तोफखाना पोलिसांचा दुरध्वनी व्यस्त येत असल्याने श्री. सातपुते यांनी ओळखीच्या एका पोलिस कर्मचाऱ्यास माहिती दिली. त्यानंतर पोलिस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले. 

मयत व्यक्ती ही सारोळा कासार येथील धामणे नावाची असल्याची प्राथमिक माहिती मिळाल्यावर पोलिस प्रशासन व श्री. सातपुते यांनी संबंधित कुटुंबियांशी संपर्क साधत अपघाताची माहिती दिली. मयत धामणे न्यु आर्टस महाविद्यालयात इंग्रजी विषयाचे प्राध्यापक होते. 

१२ वर्षापूर्वी ते सेवानिवृत्त झाले होते. त्यानंतर त्यांनी एल.एल.बी.पदवी घेवुन नगरच्या न्यायालयात तसेच औरंगाबाद खंडपीठात वकिली ही केली. ते सध्या नगरमध्येच बालिकाश्रम रोड परिसरात रहायला होते. त्यांच्या पश्चात पत्नी, २ मुले, १ मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.