कुकडीच्या आवर्तनातील राजकीय हस्तक्षेप थांबवा


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- श्रीगोंदा तालुक्यातील शेतकऱ्यांना कुकडी व घोडचे हक्काचे पाणी मिळावे. यासाठी कुकडी व घोडच्या आवर्तनात होणारा राजकीय हस्तक्षेप थांबवून कुकडीचे आवर्तन राजकारणमुक्त, तणावमुक्त करून शेतकऱ्यांना पाणी मिळवून देण्यासाठी सर्वानी एकत्र यावे. असे मत माजीमंत्री बबनराव पाचपुते यांनी शुक्रवारी व्यक्त केले. 

Loading...
श्रीगोंद्यातील महादजी शिंदे विद्यालय माजी विद्यार्थी संघ यांनी तालुक्यातील कुकडी, घोड लाभधारक शेतकऱ्यांसाठी व पाणीवापर संस्थानसाठी दि.२ सप्टेंबर रोजी श्रीगोंदा शहरातील नक्षत्र मंगल कार्यालयात प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केले आहे. त्याची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत पाचपुते बोलत होते. 

यावेळी पाचपुते म्हणाले की, कुकडी काय आहे हे सर्वांना समजावे, यासाठी कुकडीच्या अधीक्षक अभियंता धुमाळ यांनी पुढाकार घेतला असून. त्यासाठी हे प्रशिक्षण शिबीर आयोजित केले आहे.२०१८ श्रीगोंदा तालुक्यात कुकडीच्या आवर्तनात राजकीय हस्तक्षेप होतो.त्यामुळे कुकडीचे पाणी वाटप व सर्वच तलाव त्या भागात संस्था निर्माण करून त्यांच्या ताब्यात देण्याची गरज आहे. 

२००८/९सालापर्यंत कर्जत, करमाळा तालुक्यातील कालव्यांची दुरुस्ती झालेली नव्हती. त्यामुळे श्रीगोंदयाला दहा बारा वर्षे पूर्णक्षमतेने पाणी मिळत होते. आता त्या भागातील कालवे दुरुस्त झाले आहेत. त्यामुळे श्रीगोंद्याला कमी प्रमाणात पाणी मिळत आहे. त्या पाण्यावर श्रीगोंद्याचा हक्क नव्हताच तसेच कुकडी हा आठमाही प्रकल्प आहे. 

त्यामुळे उन्हाळ्यात पाणी मिळण्यात अडचण येते, कुकडी कालव्याची लांबी वाढली. परंतु रुंदी मात्र कमीच राहिली त्यामुळे पूर्ण दाबाने पाणी सोडता येत नाही. आवर्तन लांबत असून ते कमी करण्यासाठी सिस्टीममध्ये सुधारणा करण्याची गरज आहे. माणिकडोह धरण साडेदहा टीएमसी असून ते पूर्णक्षमतेने भरत नाही. त्यामुळे डिंभे धरणातून बोगदा काढून माणिकडोह धरणात पाणी सोडणे गरजेचे आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.