मित्राच्या त्रासास कंटाळून तरुणीची आत्महत्या


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- नातेवाइकांना जिवे मारण्याची धमकी देत सतत त्रास देणाऱ्या मित्रास कंटाळून तरुणीने आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हिंगणे खुर्द येथे हा प्रकार उघडकीस आला. 

प्रतीक्षा प्रकाश कोळेश्वर (वय १९, रा. एकता कॉलनी, कोथरूड) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी प्रकाश कोळेश्वर (५४, रा. नांदेड) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार मयूल (रा. अकोला बायपास, हिंगोली) याच्याविरोधात सिंहगड रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


Loading...
आरोपी मयूल आणि प्रतीक्षा यांची हिंगोली शहरात भेट झाली. काही महिन्यांपूर्वी प्रतीक्षा शिक्षणासाठी पुणे येथे आली आणि कोथरूड परिसरातील एका हॉस्टेलमध्ये राहत होती. आरोपी मयूल हा प्रतीक्षावर प्रेम करीत होता. मात्र, दोघांमध्ये भांडण झाल्याने ती त्याच्याशी बोलत नव्हती. 

आरोपीने प्रतीक्षासोबत काढलेले फोटो तिच्या कुटुंबीयांना दाखविले आणि नातेवाइकांना जिवे मारण्याची धमकी देत वेळोवेळी कॉल करून तसेच व्हॉट्सॲपवर मेसेज पाठवून तिच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करायचा. 

आरोपी मयूल हा पुणे शहरात आला. त्याने प्रतीक्षाची भेट घेत तिच्यासोबत भांडण केेले.आरोपी मयूलच्या मानसिक आणि शारीरिक त्रासाला ती कंटाळली होत्या. 

दि. १७ ऑगस्ट रोजी प्रतीक्षा तिच्या हिंगणे खुर्द येथे राहणाऱ्या मैत्रिणीच्या घरी गेली होती. काही कामानिमित्त मैत्रीण घराबाहेर पडल्यानंतर तिने नैराश्यातून घरात गळफास घेत आत्महत्या केल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. 

प्रतीक्षाला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी आरोपी मयूलविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. पुढील तपास सिंहगड पोलीस करीत आहेत.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.