शिर्डीत बसस्थानकावर चोरी करणाऱ्या महिलांना अटक.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-  शिर्डी बसस्थानकावरून नऊ तोळ्याचे सोन्याचे दागिने व ५० हजार रुपयांची रोकड लांबविल्याप्रकरणी श्रीरामपूर येथील दोन महिलांना शिर्डी पोलिसांनी ताब्यात घेतले, त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.


Loading...
याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, शिर्डी बसस्थानकावर औरंगाबादकडे जाण्यासाठी निघालेल्या रंजना लक्ष्मण रत्नपारखी व आशा दीपक शिरोळे यांचा नऊ तोळ्याचे सोन्याचे दागिने व ५० हजार रुपये रक्कम दि. २७ सप्टेंबर चोरी जाण्याची घटना घडली होती. 

त्यांच्या तक्रारीवरुन शिर्डी पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी बसस्थानकावरील सी.सी.टिव्ही फुटेज तपासून पोलीस निरीक्षक अरविंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरिक्षक अशोक खरात यांनी तपासाला सुरवात केली. चोरीत श्रीरामपूर येथील महिलांचा सहभाग असल्याचे तपासात निष्पन्न झाले. 


शिर्डी पोलिसांनी श्रीरामपूर येथे जाऊन या गुन्ह्यातील संशयित महिला शोभा शंकर दामोदर व सिंधु शंकर गायकवाड (वार्ड २, श्रीरामपूर) यांना ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता दोन्ही महिलांनी चोरी केली असल्याची कबुली दिली. 


गेल्या काही दिवसांत बसस्थानकावर चोरीचे प्रमाणात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. श्रीरामपूर येथील काही महिला चोरी करुन तात्काळ पळून जात असल्याचे पोलीसांच्या लक्षात आले होते. त्यावरून शिर्डी पोलीस पथकाने चोरी अशा चोऱ्या उघडकीस आणण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहे. 

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.