'श्रीरामपूर जिल्हा मुख्यालय व्हावे' अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-  श्रीरामपूर जिल्हा मुख्यालय होण्यासाठी श्रीरामपूर जिल्हा कृती समितीने आयोजित केलेल्या जनजागृती अभियानाला श्रीरामपूर शहर, तालुक्यासह शेजारील नेवासा, राहुरी, राहाता तालुक्यातील नागरिकांनीही उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. त्यात राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, व्यापारी, कृषि, उद्योजक, कामगार आणि सर्वसामान्य नागरिकांनी सहभाग नोंदविला. 


Loading...
आमदार भाऊसाहेब कांबळे, माजी आमदार भानुदास मुरकुटे, नगराध्यक्षा अनुराधा आदिक, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अविनाश आदिक, बाजार समिती सभापतीचे सचिन गुजर, प्रभात उद्योग समुहाचे किशोर निर्मळ, केशवराव आदिक, मुळा प्रवराचे संचालक सिद्धार्थ मुरकुटे, अरुण धर्माधिकारी, श्रीरामपूर नगरपालिकेचे नगरसेवक, नगरसेविका, शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख अरुण पाटील, छावा संघटनेचे जिल्हाप्रमुख नितीन पटारे, ॲड. सुभाष जंगले, अशोकराव बागुल, शिवसेना शहराध्यक्ष सचिन बडधे, व्यापारी सेना जिल्हाध्यक्ष रामा अग्रवाल, बाबासाहेब काळे, कॉ. अण्णापाटील थोरात, मुख्याध्यापक संघटनेचे भागचंद औताडे, स्वाभिमानी संघटनेचे जितेंद्र भोसले, लकी सेठी, अजय डाकले यांच्यासह श्रीरामपूर- बेलापूर व्यापारी संघटना आदींनी सहभाग नोंदविला.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.