सरकारी नोकरीच्या शोधात आहात?, तर हे नक्की वाचा !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- अनेक तरुण-तरुणी सरकारी नोकरी मिळावी यासाठी सरकारच्या विविध परिक्षा देत असतात. पण आता सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. आता बऱ्याच सरकारी विभागांत नोकरभरती केली जाणार आहे.

उत्तराखंड चिकित्सा सेवा बोर्डच्या असिस्टेंट प्रोफेसरसाठी 138 पदांची भरती केली जाणार आहे. त्य़ासाठी वयोमर्यादा ही 45 वर्षांची आहे. त्याचबरोबर तुम्ही www.ukmssb.org अधिकृत वेबसाईटवर 26 ऑक्टोबरपर्यंत यासाठी अर्ज करू शकता.
Loading...

भारत हेवी इलेक्ट्रिकल लिमिटेडमध्ये टेक्नीशियन अप्रेंटिससाठी (कॉन्ट्रॅक्ट), 320 पदांची भरती करण्यात येणार आहे. यासाठी संबंधीत ट्रेडमधील डिप्लोमाची गरज आहे. या पदासाठी २७ वर्षांची मर्यादा आहे. त्याचबरोबर ३१ ऑक्टोबरपर्यंत www.bheledn.com या अधिकृत वेबसाईटवर तुम्ही आपले नाव नोंदवू शकता.

तामिळनाडूच्या मेडिकल सर्व्हिसेज रिक्रुटमेंट बोर्डमध्ये असिस्टेंट सर्जनसाठी १८८४ पदांसाठी जागा भरण्यात येणार आहे. यासाठी एमबीबीएसची डिग्री आवश्यक आहे. १५ ऑक्टोबरपर्यंत www.mrb.tn.gov.in या अधिकृत वेबसाईटवर तुम्ही आपले नाव नोंदवू शकता.

दिल्ली हायकोर्टामध्ये पर्सनल असिस्टेंटसाठी ३५ जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी पदवीधर असण्याची आवश्यकता आहे. १८ ते २७ वयोगट असलेल्या इच्छुकांनी १२ ऑक्टोबरपर्यंत delhihighcourt.nic.in इथं नोंदणी करू शकता.

नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ आयुर्वेदमध्ये लोअर डिव्हिजन क्लर्क आणि मल्टी टास्किंग स्टॉफसाठी भरती करण्यात येणार आहे. यामध्ये १०वी–१२वी पास मुलांसाठी वेगळ्या जागा तर २५ ते ३० वयोगटातील लोकांसाठी वेगळ्या जागा आहेत. यासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत www.nia.nic.in या अधिकृत वेबसाईटवर तुम्ही आपले नाव नोंदवू शकता.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.