गोळीबार झालेल्या तरुणाने केली आत्महत्या.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-  प्रेम प्रकरणातून दीड वर्षांपूर्वी गोळीबार झालेल्या एका तरुणाने आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शहरातील मालदाड रस्त्यावर घडली. दीपक रंगनाथ दुसाने (वय 22 रा. मालदाड रोड, दत्त नगर घुलेवाडी ) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. 


Loading...
याबाबत शहर पोलिसांकडून समजलेली अधिक माहिती अशी, की दीड वर्षांपूर्वी संगमनेर महाविद्यालयाच्या पाठीमागील बाजूस एकता चौकात मुलीच्या प्रेम प्रकरणाच्या कारणावरून दुसाने याच्यावर गोळीबार करण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी त्या प्रकरणात त्याला अटकही केली होती. 

त्यानंतर तो जामिनावर सुटला होता. दीपकने आज शुक्रवारी आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली; मात्र त्याच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याबाबत घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या खबरीवरून शहर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.