श्रीगोंद्यातील शेतकऱ्यांची ५३ लाखांची फसवणूक.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- शेतातील कांदा बांगलादेशात जादा भावाने विकून देतो. कांद्याची पट्टी आली की ४५ दिवसात पैसे देतो. असे आमिष दाखवून शहानूर शमशुद्दीन आतार (रा बनकर मळा श्रीगोंदा) याने श्रीगोंदा तालुक्यातील सात शेतकऱ्यांना ५३ लाखास फसविले. 


Loading...
ही घटना सन २०१६ मध्ये झाली असून स्वप्नील संजयराव जामदार रा.कोकणगाव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहानुर आतार याच्या विरोधात श्रीगोंदा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहानूर आतार याने श्रीगोंदा बाजार समितीचे शॉपिंग सेंटरमध्ये अलिशान शेतीमाल एक्सपोर्ट ऑफीस टाकले आणि शेतकऱ्यांच्या डोळ्यात धूळफेक केली आहे. 

यामध्ये स्वप्नील जामदार १८ लाख, मदनंद फडणवीस ११ लाख ९१हजार, शंकर लबडे १ लाख २७ हजार, पंडित डेबरे ८३ हजार, सचिन लगड १६ लाख, संजय गायकवाड २ लाख ५० हजार व सुनील काळे यांना ४६ हजारांस फसविले आहे. शहानूर आतार याने वरील शेतकऱ्यांकडून जुलै ते डिसेंबर २०१६ मध्ये कांदा नेला शेतकऱ्यांनी अनेक वेळा पैशाची मागणी केली पण त्याने थापा मारून वेळ काढूपणा केला.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.