अपघातातील मयतांच्या वारसांना ७२ लाख रुपये देण्याचा आदेश


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- मोटार अपघात प्रकरणात जिल्हा न्यायाधिश तथा मोटार अपघात न्यायाधीकरण एस.आर. नावंदर यांनी अपघातातील मयताच्या वारसास व्याजासह ७२ लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचा आदेश दिला. या खटल्यात अर्जदाराच्या वतीने ॲड. व्ही.के. भोर्डे यांनी काम पाहिले. 


Loading...
या घटनेची थोडक्यात माहिती अशी की, दि. ५/४/२०१६ रोजी श्रीकांत भास्कर चव्हाण (रा. तांदुळवाडी ता. राहुरी) हे त्यांची मोटारसायकल (एचएम १६ ऐडी ३३९३) वरून राहुरीकडून अहमदनगरकडे जात असताना शनीशिंगणापूर फाट्याजवळ टेम्पोने (एमएच ०४ सीपी ९३७२) त्यांना जोराची धडक दिली. त्यात ते जखमी झाले.

जखमीवर नोबेल हॉस्पिटल येथे व त्यानंतर विळदघाट येथील विखे हॉस्पिटलमध्ये उपचार झाले. तेथे उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. याबाबत राहुरी पोलिस ठाण्यात अपघाताचा गुन्हा नोंदविण्यात आला. दरम्यान मयताच्या वारसांनी अपघाती मृत्यूची नुकसान भरपाई मिळण्यासाठी टेम्पो मालक व टेम्पोची विमा कंपनी विरुध्द मोटार अपघात दावा दाखल केला होता. 


या अर्जात अर्जदाराने साक्षी पुरावा नोंदवून सदर अपघात टेम्पो चालकाच्या चुकीमुळे झाला. त्यात श्रीकांत चव्हाण याचा मृत्यू झाल्याने त्याचे वय त्याचे मासिक उत्पन्न विचारात घेवून अर्जदाराच्या वकिलांचा युक्तीवाद पाहता न्यायालयाने मयताच्या वारसांना टेम्पो मालक व विमा कंपनीकडून अपघात नुकसान भरपाई रक्कम ६२ लाख ९६ हजार ५०० रुपये व त्यावर अर्ज दाखल झाल्यापासून द.सा.द.शे. आठ टक्के व्याज देण्याबाबतचा आदेश केला.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.