चुलत दिराकडून भावजयीला मारहाण करून अत्याचार


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- पती बाहेरगावी असल्याने घरात एकटी झोपलेली असलेल्या भावजयीवर तिच्या चुलत दिराने मध्यरात्री घरात घुसून भावजयीस मारहाण करून तिच्यावर अत्याचार केल्याची घटना साकुरी येथे घडली. या प्रकरणी राहाता पोलीसांनी आरोपी चुलत दिराविरूध्द अत्याचाराचा गुन्हा दाखल केला असून आरोपी फरार झाला आहे.


Loading...
याबाबत पोलीसांकडून समजलेल्या माहितीनुसार ही घटना गुरूवार दि. २७ रोजी रात्री एक ते दिड वाजेच्या सुमारास साकुरी येथे घडली. पिडीत महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार महिला एकटी घरी झोपलेली असताना तिचा वाकडी (ता.राहाता) येथील चुलत भाया याने रात्री एक ते दिड वाजेच्या सुमारास घराची कडी वाजवली व तो घरात घुसून म्हणाला, 'दोन दिवसापासून तुझा नवरा घरी आला नाही, त्याला शोधून काढू, तू काळजी करू नको' त्यानंतर घराची आतून कडी लावून 'मी आज तुझ्या घरी मुक्काम करतो' असे तो म्हणाला. 

त्याला 'नवरा घरी नाही तुम्ही थांबू नका' असे मी सांगीतले असता त्याने मला लाथाबुक्क्यांनी मारहाण करत अत्याचार केला. कुणाला सांगीतले तर जिवंत मारून टाकील अशी धमकी देऊन तो निघून गेला. याची फिर्याद सदर अत्याचारीत महिलेने राहाता पोलीसांत दिली असून त्यावरून राहाता पोलीसांनी आरोपीच्या विरूद्ध भादंवि कलम ३७६ (१) (क) ४५२,३२३,५०६ प्रमाणे गुन्हा दाखल केला. 

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.