नीलेश लंके नावाच्या वादळाने पुढाऱ्यांची झोप उडाली !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- लंके नावाच्या वादळाने तालुक्यातील पुढाऱ्यांची झोप उडाली आहे. प्रहार संघटनेच्या आमदार बच्चू कडूंप्रमाणे तालुक्यात काम करून २०१९ मध्ये मी एकटा आमदार होणार नसून तालुक्यातील प्रत्येक कार्यकर्ता आमदार होईल, असा दावा शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख नीलेश लंके यांनी केला.

तालुक्याचा आमदार होणार
सुपे येथील सफलता लॉन्सवर पारनेर व नगर तालुक्यातील नीलेश लंके प्रतिष्ठानचा कार्यकर्ता मेळावा झाला. याप्रसंगी ते बोलत होते. शिवसेनेतून पायउतार झाल्यानंतर लंके भाजपत जाणार की राष्ट्रवादीत, ही चर्चा सुरू असताना लंके यांनी मी आमदार बच्चू कडूंप्रमाणे काम करून तालुक्याचा आमदार होणार आहे. विधानसभेच्या वेळी कोणता पक्ष, काय निर्णय घ्यायचा तो कार्यकर्त्यांशी बोलून घेऊ, असे स्पष्ट केले.  

Loading...


राष्ट्रवादीशी केलेली युती पक्षविरोधी नाही का? 
लंके म्हणाले, गेली २० वर्षे मी रात्रंदिवस शिवसेनेसाठी काम केले. वाडी-वस्तीवर सेनेचा कार्यकर्ता तयार केला. सुजित झावरे व मी एका कार्यक्रमात एकत्र येऊन अपंगांना काठ्यांचे वाटप केले. या बातमीचे कात्रण घेऊन आमदार मातोश्रीवर गेले. पक्षविरोधी काम केले म्हणून मला काढून टाकले, मग आता बाजार समितीत राष्ट्रवादीशी केलेली युती पक्षविरोधी नाही का? 

फक्त सभामंडप बांधून विकास होत नाही
तालुक्यात फक्त यांनीच राजकारण करायचे, कार्यकर्त्यांनी फक्त सतरंज्या उचलायच्या का? स्वत:ला कार्यसम्राट म्हणवणाऱ्यांनी तालुक्याचा काय विकास केला. फक्त सभामंडप बांधून विकास होत नाही, रस्त्यांची कामे केली, तथापि, तीनच महिन्यांत हे रस्ते उखडले, अशी टीका आमदार विजय औटी यांचे नाव न घेता लंके यांनी केली.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.