वेळेवर योग्य उपचार घेतल्यास स्वाइन फ्लू पूर्णपणे बरा होतो.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- स्वाइन फ्लूबाबत नागरिकांनी घाबरुन जाऊ नये. वेळेवर योग्य उपचार घेतल्यास हा आजार पूर्ण बरा होतो, असे नगराध्यक्ष अनुराधा आदिक यांनी सांगितले. नगरपरिषदेच्या वतीने स्वाइन फ्लू आजाराविषयी शहरातील डॉक्टरांच्या बैठकीत त्या बोलत होत्या. 

Loading...
साखर कामगार रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. रवींद्र जगधने, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मोहन शिंदे, डॉ. सचिन पऱ्हे, डॉ. दिलीप पडघन, डॉ. महेश क्षीरसागर, डॉ. अनिल मोमले, डॉ. सुधीर आगाशे, डॉ. प्रतिभा जोशी, सिस्टर स्टेला आदी यावेळी उपस्थित होते. 

आदिक म्हणाल्या, नागरिकांनी आपल्या घरासह परिसराच्या स्वच्छतेची काळजी घेतल्यास सर्व प्रकारच्या साथीचे आजार थोपवण्यास मदत होईल. साथीचे छोटे आजार असल्यास त्वरित डॉक्टरांकडून उपचार घ्यावेत. त्यामुळे मोठे आजार टाळता येतील. 

स्वाइन फ्लू संसर्गजन्य आजार असल्याने सहवासातील रुग्ण, नातेवाईक यांनी टॉमी फ्लू गोळ्या सेवन कराव्यात, जेणेकरुन त्यांना या आजारापासून बचाव करता येईल. डॉ. शिंदे यांनी स्वाइन फ्लू आजार व त्यावरील उपचाराबाबत मार्गदर्शन केले. स्वाइन फ्लू टॉमी फ्लू गोळ्यांद्वारे बरा केला जाऊ शकतो, असे त्यांनी सांगितले. डॉ. पऱ्हे यांनी काय काळजी घ्यावी, याबाबत माहिती दिली.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.