एम्सच्या धर्तीवर शिर्डीत रुग्णालय उभारणार.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- एम्सच्या धर्तीवर प्रत्येक राज्यात सुसज्ज हॉस्पिटलची निर्मिती करण्याचा केंद्राने निर्णय घेतलेला आहे. केंद्राच्या या निर्णयाची अंमलबजावणी शिर्डीतून करावी. यासाठी आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा सुरू केला असून केंद्र व राज्य सरकार त्यासाठी सकारात्मक आहे. 


Loading...
२ हजार कोटींचा खर्च असलेल्या या सुपरस्पेशालिटी रुग्णालयास केंद्राने १ हजार कोटी व राज्य सरकार व साई संस्थानने एक हजार कोटी खर्च करावेत. साई समाधी शताब्दी वर्षात हा रुग्णसेवेचा प्रकल्प शिर्डीत उभा राहिल्यास नगर जिल्ह्याप्रमाणेच देशातील रुग्णांसाठी महत्त्वपूर्ण ठरेल, असा विश्वास खासदार सदाशिव लोखंडे यांनी व्यक्त केला. दरम्यान, साईंच्या शताब्दी महोत्सावासाठी जगभरातून भाविकांची चांगली साेय होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------


Powered by Blogger.