महिलेस मुले, नातू व सुनांकडूनच मारहाण !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- शहरातील एका महिलेस तिच्या मुले, नातू व सुनांनी मारहाण केल्याची घटना काल घडली.याबाबत श्रीरामपूर शहर पोलिसांनी सांगितले, की मंगळवारी रात्री साडेआठ वाजता आरोपींनी सुशिला शशिकांत चिटणीस (रा. मोरगे वस्ती, वॉर्ड ७) यांना घरातून निघून जा, असे सांगितले. 

Loading...
यावर सुशिला त्यांनाच तुम्हीच घरातून निघून जा, अशा म्हणाल्या, याचा राग आल्याने त्यांचा मुलगा किशोर शशिकांत चिटणीस व नातू अतूल किशोर चिटणीस यांनी लोखंडी रॉडने डोक्यात मारले, तसेच दुसरा मुलगा हेमंत शशिकांत चिटणीस, सुना मोनिका किशोर चिटणीस व आरती हेमंत चिटणीस तसेच लखन कुऱ्हे (सर्व रा. मोरगे वस्ती) यांनी लाथा, बुक्कयांनी मारहाण केली.

याप्रकरणी सुशिला चिटणीस यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार वरील सहा जणांविरुद्ध श्रीरामपूर शहर पोलिसांनी गुन्हा रजिस्टर क्रमांक ३०४/१८ नुसार भा.दं.वि. कलम ३२६, ३२४, ३२३, ५०६, ५०४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास हेड कॉन्स्टेबल काळे करीत आहेत.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.