महिलेस मारहाण करत बलात्कार करून जिवे मारण्याची धमकी.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- घरात एकटी झोपलेल्या महिलेच्या घरात तुझ्या नवऱ्याला शोधून काढू, असा बहाणा केला. नंतर मारहाण करत बलात्कार करून जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी राहाता पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. साकुरी येथील गोदावरी वसाहतीमध्ये एक दाम्पत्य वास्तव्यास होते. 
Loading...
या महिलेचा पती दोन-तीन दिवासांपासून घरी न आल्याने ती पतीस फोन लावत होती. मात्र, फोन लागला नाही. बुधवारी रात्री १० वाजता जेवण करून झोपली होती. मध्यरात्री दरवाजा वाजवल्याचा आवाज आला. पती आले असावे म्हणून दार उघडून पाहिले असता बापू अर्जुन खरात (रा. वाकडी, ता. राहाता) हा होता. तुझा पती आपण शोधून काढू, असे म्हणत त्याने मला पाणी मागितले.

मी आज येथेच मुक्काम करणार आहे. असे म्हणत त्याने या महिलेवर बलात्कार केला. याबाबत कुठे वाच्यता केल्यास जिवे मारेन, अशी धमकी दिली. पीडित महिलेच्या फीर्यादीवरून आरोपीविरोधात राहाता पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.