बाळासाहेब पवार आत्महत्याप्रकरणी दाखल असलेला गुन्हा रद्द


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- उद्योजक बाळासाहेब पवार आत्महत्येप्रकरणी दाखल करण्यात आलेल गुन्हा हायकोर्टाने रद्द केला. खंडपीठाने अर्जदारांची विनंती मान्य केली आहे. नगर शहरातील उद्योजक बाळासाहेब पवार यांनी ३१ मार्च २०१८ रोजी स्वत:च्या रिव्हॉल्व्हरमधून गोळी झाडून आत्महत्या केली होती. 

Loading...
त्यापूर्वी त्यांनी सुसाईड नोट लिहिली होती. त्यात खासगी सावकारांच्या सर्व रकमेची परतफेड केल्याचे म्हटले होते. पण कुठल्या सावकाराने त्रास दिल्याचा उल्लेख केलेला नव्हता.

पवार यांच्या मुलीने पोलिसांमध्ये तक्रार दिली. त्याआधारे विनायक रणसिंग व आशा कटारिया व इतर जणांविरुद्ध कलम ३०६ प्रमाणे तक्रार देण्यात आली. त्याआधारे पोलिसांनी गुन्हा दाखल केला. हा गुन्हा रद्द करण्यासाठी आशा कटारिया व विनायक रणसिंग यांनी अॅड. अभिजित मोरे यांच्यामार्फत हायकोर्टात फौजदारी याचिका दाखल केली होती.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------


Powered by Blogger.