राहुरीत दागिन्यांसह लाखभर रुपयांचा ऐवज लांबविला


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- मध्यरात्री अज्ञात चोरट्याने घर फोडुन सोन्या-चांदीचे दागिने, तीन मोबाईल व रोख रकमेसह सुमारे लाखभर रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरुन नेल्याची घटना घडली आहे. याबाबत राहुरी पोलिसात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. 

Loading...

राहुरी खुर्द येथिल मित्र परिवार कॉलनी येथिल रहिवासी अनिल पांडुरंग जवणे (वय ३५) हे कृषी विद्यापिठामध्ये नोकरदार आहेत. रात्री जवणे यांचे कुटूंब व त्यांच्या घरी आलेले पाहुणे असे महिला व पुरुष सात-आठ जण पहाटे गाढ झोपेत असताना अज्ञात चोरट्यांनी पाठिमागिल बाजुचा दरवाजा कटावनीच्या सहाय्याने तोडून आत प्रवेश केला. 


महिलेच्या गळ्यातील सोने व चांदीचे दागिने,इतर रोख रक्कम,दोन सॅमसंग व एक ओपो कंपनीचा मोबाईल असा लाखभर रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरुन नेला. काहीतरी वाजल्याचा आवाज आल्याने जवणे यांच्या कुटूंबातील महिलेला जाग येताच चोरीचा प्रकार समोर आला. 


त्यानंतर नागरीक जागे झाले. तत्काळ या भागातील सुरक्षा कमाचाऱ्याला बोलवुन घेत पोलिस पाटलाशी संपर्क करण्यात आला.पोलिस पाटील बबनराव अहिरे यांनी राहुरी पोलिसांशी संपर्क साधला. घटनेच्या ठिकाणी पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर हे पोलीस फाट्यासह दाखल झाले. पोलिसांनी आजुबाजुला शोध घेतला असता चोरटे पसार झाले होते. 

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.