महिलेचे अश्चील चित्रण करून तीन वर्षापासून अत्याचार,गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी !

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- जामखेड मध्ये तीन वर्षापासून एका महिलेचे अश्­लील चित्रण करून सार्वजनिक ठिकाणी व्हायरल करण्याची धमकी देत,अत्याचार केले. तसेच माझ्या विरोधात दिलेली फिर्याद मागे घे, नाहीतर गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी फिर्यादी महिलेला दिली. या प्रकरणी चौघांविरोधात जामखेड पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, पीडित महिला नोकरीस असून फिर्यादीत म्हटले आहे की, आरोपी मुस्तफा अझरुद्दीन शेख, इम्रान सदरोद्दीन शेख, वसीम वाहेद कुरेशी ( बिल्डर), मुझफ्फर गणीभाई आतार रा.सर्व सदाफुले वस्ती, यातील आरोपी नंबर एकने तीन वर्षांपासून वेळोवेळी अत्याचार करून कोऱ्या कागदावर व स्टॅम्पवर सह्या घेऊन. मी माझ्या पद्धतीने यावर काहीही लिहून तुला अडचणीत आणेल तसेच तुझा अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देवून. तीन वर्षापासून अत्याचार करत होता. 

Loading...

तसेच दि.१७ सप्टेंबर रोजी फिर्यादीच्या घरी आरोपींनी येऊन मुले झोपलेल्या खोलीचा दरवाजा बंद करून मला ओढत नेऊन पोलिसांत तक्रार देण्यासाठी गेली होती. तु कोणाला काही सांगितल्यास मुलांना मारण्याची धमकी देत अत्याचार केला. 


आरोपी एक सोबत आलेले इम्रान सदोरोद्दीन शेख, वसीम वाहेद कुरेशी (बिल्डर) व मुजफ्फर गनिभाई अतार यांनी पीडित महिलेच्या घरात घुसून हीला व हिच्या मुलीला काम दाखवू तसेच आरोपी नंबर दोनने पीडितेस धरले व आरोपी तीनने डोक्याला पिस्तूल लावून आमच्या मित्राविरोधातील फिर्याद मागे घे, नाहीतर तुला व तुझ्या मुलाला ठार करण्याची धमकी दिली. या प्रकरणी वरील चार जणांना विरोधात जामखेड पोलिस स्टेशनला अत्याचार, जातिवाचक शिवीगाळ, आर्म ॲक्ट नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.