सुजित झावरे पाटील यांची पक्षातून गच्छंती अटळ !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- सुजित झावरे यांनी पक्षविरोधी कारवाया सुरू केल्या आहेत. पक्षाने त्यांना कारणे दाखवा नोटीस दिली असून,त्याला योग्य उत्तर न आल्यास व पक्षविरोधी कारवाया न थांबविल्यास त्यांची पक्षातून गच्छंती अटळ आहे. मी व दोन्ही कॉंग्रेस सभापती प्रशांत गायकवाड यांच्यासोबत आहे. 

Loading...
माजी उपमुख्यमंत्री अजित पवार  हे औरंगाबादवरून पुण्याला चालले असताना नगर येथील शासकीय विश्रामगृहावर राष्ट्रवादीच्या असंतुष्ट गटाने पवार यांची भेट घेऊन बाजार समितीच्या घडामोडीची माहिती दिली, या वेळी ते बोलत होते.

पक्षविरोधी काम करणाऱ्यांना माझ्याकडे स्थान नाही!
सुजित झावरे यांच्याबाबत खूप तक्रारी आहेत. गेल्या तीन दिवसांपासून ते माझी भेट मागत आहे, पण मी दिली नाही. झावरे यांनी आमदार विजय औटी यांच्याशी केलेली हातमिळवणी मला पटलेली नाही. पक्षविरोधी काम करणाऱ्यांना माझ्याकडे स्थान नाही, असे पवार यांनी सांगितले.

या वेळी राष्ट्रवादीचे नेते दादाभाऊ कळमकर, मधुकर उचाळे, अशोक सावंत, प्रशांत गायकवाड, दीपक पवार, वर्षा नगरे, शंकर नगरे, बाबाजी तरटे, विक्रमसिंह कळमकर, बबुशा वरखडे, सोमनाथ वरखडे, इंद्रभान गाडेकर आदी उपस्थित होते. कॉंग्रेसचे युवा नेते राहुल शिंदे हेही या वेळी उपस्थित होते.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.