पाचवीतील विद्यार्थ्यांना लैंगिक शिक्षणाचे धडे देणाऱ्या शिक्षकाला पालकांनी चोपले!


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- कोपरगाव तालुक्यात इयत्ता पाचवीतील विद्यार्थ्यांना परिसर अभ्यास भाग 1 शिकविण्याऐवजी शिक्षकाने चक्‍क लैंगिक शिक्षणाचा धडाच शिकविला. हा धडा विद्यार्थिंनी घरी पालकांना विचारल्यानंतर पालक संप्तत झाले. त्यांनी थेट शाळा गाठून त्या शिक्षकाला चांगलाच चोप दिला. त्या शिक्षकाने माफी मागितल्यानंतर त्याला सोडून देण्यात आले. 


Loading...
तालुक्‍यातील मुर्शतपुर येथील जिल्हा परिषदेत शाळेत हा प्रकार आज दुपारी उघडकीस आला. तालुक्‍यातील मुर्शतपुर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील इयत्ता 5 वीच्या विद्यार्थ्यांना परिसर भाग 1 मधील आहार विहार या विषयावर धडा शिकविताना एका शिक्षकाने लैंगिक शिक्षणाचा धडा सुरू केल्याने वर्गातील विद्यार्थी आवाक झाले. 

काही विद्यार्थिंनी या शिक्षकाचा धडा घरामध्ये पालकांना विचाराला. त्यामुळे पालकामध्ये संतापाची लाट उसळली. पाचवीतील विद्यार्थिंना अशा शब्दात शिक्षण देणाऱ्या शिक्षकाला जाब विचारण्यासाठी पालकांनी थेट शाळा गाठली. परंतु तो शिक्षक आठ दिवस रजेवर गेला होता. 


अखेर आठ दिवसानंतर तो शिक्षक आज शाळेत आल्यानंतर पालकांनी वर्गात जावुन धुलाई करीत जाब विचारला.महिला पालकांनी या शिक्षकाला चांगलाच चोप दिला. दरम्यान, या घटनेची माहिती तालुक्‍यात वाऱ्यासारखी पसरली. गटशिक्षणाधिकारी शबाना शेख बैठकीला गेल्याने त्यांना झालेला प्रकार काही वेळात समजला.परंतु “तेरी भी चुप, मेरी भी चुप’ या प्रमाणे काही न झाल्यासारखे सुरू होते.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.