कर चुकवेगिरी करणाऱ्या अहमदनगरमधील 'त्या' ट्रस्टवर आयकरचे छापे !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- कर चुकवेगिरी व गैरव्यवहाराच्या संशयावरून अहमदनगर व औरंगाबाद येथील चालविल्या जाणाऱ्या एका ट्रस्टच्या शिक्षण संस्था, व्यवसायांवर आयकर विभागाने छापे टाकले आहेत.यावेळी संस्थेतील सर्व कर्मचार्यांना बसवून ठेवण्यात आले होते,या ठिकाणी मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता
Loading...

मंगळवारी सकाळी एका मोठ्या ट्रस्ट अंतर्गत औरंगाबाद व अहमदनगर येथील विविध कार्यालये, संस्था, आयुर्वेदिक महाविद्यालय, फार्मसी महाविद्यालय इतर व्यवसायांत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याने आयकर विभागाने मंगळवारी एकाच वेळी छापे मारले. यासाठी ४० ते ५० अधिकाऱ्यांची टीम काम करत आहे. ही कारवाई बुधवारी (दि.२६) उशिरापर्यंत सुरू राहील, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. 

महाविद्यालयांमध्ये घेण्यात आलेले डोनेशन,विद्यार्थी संख्या,आयकराचा भरणा, कर्मचारी तसेच प्राध्यापकांच्या वेतनावरील खर्च,विविध बँक खात्याबाबत तपासणी यावेळी करण्यात येत होती.या सर्व कागदपत्रांची तपासणी केली जात असून सुमारे २५ कोटींचा गैरव्यवहार झाल्याचा संशय सूत्रांनी व्यक्त केला.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.