बिबट्याच्या हल्ल्यात दोन शेतकरी जखमी


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- राहाता तालुक्यातील राजुरी येथे दोन शेतकऱ्यांना बिबट्यांने हल्ला करून जखमी केल्याची घटना नुकतीच घडली आहे.राजुरी येथील शेतकरी शिवाजी दादा गोरे विहिरीवरील मोटार चालू करण्यासाठी गेले असता समोरून येणाऱ्या बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला. यात ते जखमी झाले. त्यांच्यावर श्रीरामपूर येथे उपचार सुरु आहेत. 


Loading...
याअगोदर दोन दिवसांपूर्वी त्यांचे मोठे बंधू नानासाहेब दादा गोरे हेही त्या विहिरीवर गेले असता त्यांनाही बिबट्याने दर्शन दिले होते; परंतु प्रसंगावधान राखून त्यांनी त्याला पिटाळून लावले होते; पुन्हा त्यांच्या बंधूंवर दुसऱ्या दिवशी बिबट्याने हल्ला केल्याने ते पूर्ण भयभीत झाले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे. 

राजुरी, गोल्हारवाडी, ममदापूर, नांदूर, बाभळेश्वर, वाकडी, निर्मळ पिंपरी परिसरात अनेक बिबटे असून वनखात्याने याकडे पूर्णत: दुर्लक्ष केले आहे. मागणी करूनही पिंजरे लावण्यात येत नाही; परंतु बिबट्याने शेतकऱ्यांवर हल्ला केल्यानंतर हे अधिकारी पिंजरे लावण्याची तत्परता दाखवतात. यामुळे शेतकऱ्यांनी तक्रार केल्यानंतर वेळीच दखल घेतली तर असे हल्ले होणार नाही. याची काळजी वनाधिकाऱ्यांनी घेतली पाहिजे, अशी मागणी शेतकरी करीत आहे. 

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.