स्वाईन फ्लूचा झपाट्याने फैलाव, युवकाचा स्वाईन फ्लूने मृत्यू.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- अकोले तालुक्‍यात स्वाईन फ्लूचा फैलाव झपाट्याने होत असून सोमवारी तालुक्‍यातील तांभोळ येथील युवकाचा स्वाईन फ्लूने मृत्यू झाल्याने मृतांची संख्या आता तीनवर पोहचली आहे. युवकाचा नाशिक येथील सिव्हील हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असतांना मृत्यू झाला. 


Loading...
त्यापूर्वी त्याने अकोले येथे दोन खासगी दवाखान्यात उपचार घेतले होते. मात्र त्याची प्रकृती सुधारली नाही. त्यानंतर नाशिक येथे सिव्हील हॉस्पिटलमध्ये हरनामे यांना दाखल केले होते.त्यांनी स्वाईन फ्लूची लक्षणे सांगून रुग्ण उशिरा दाखल झाल्याने उपचाराबाबत अगतिकता व्यक्‍त केली. 

दरम्यान अनेक रुग्ण खासगी रुग्णालयात उपचार घेत असल्याने त्याचा अहवाल तालुका आरोग्य विभागास अद्याप प्राप्त झालेला नाही. या दरम्यान तालुका आरोग्य अधिकारी डॉ. इंद्रजित गंभीरे यांच्याशी संपर्क साधला असता नागरिकांनी घाबरून जाऊ नये. अफवांवर विश्वास ठेऊ नये, असे आवाहन त्यांनी केले. 

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.