राहाता तालुक्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा सावकाराविरुद्ध गुन्हा दाखल.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- व्याजाच्या पैशांचा तगादा लावल्याने लोणी येथील शेतकऱ्याने विषारी औषध प्राशन केले होते. उपचारांनंतर या शेतकऱ्याने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी दाढ बुद्रूक येथील तरूणाविरूद्ध गुन्हा दाखल केला. फिर्यादी गणेश रावसाहेब म्हस्के यांनी महेश संतराम बनसोडे याच्याकडून १ लाख रुपये १० टक्के व्याजाने घेतले होते. 
Loading...

त्यापोटी म्हस्के यांनी बोलेरो बनसोडेकडे गहाण ठेवली होती. म्हस्के यांनी आयडीबीआय बँकेचे दोन धनादेश व व्याजाची रक्कम दिली होती, तरीपण बनसोडेने तगादा करून म्हस्के यांच्याकडे १ लाख १० हजार रूपयांची मागणी केली. सातत्याने मानसिक त्रास देऊन त्यांची बोलेरो विकण्याची धमकी दिल्याने म्हस्के यांनी कंटाळून गोचीड मारण्याचे औषध घेतले होते.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.