एसटी-कंटेनर अपघातात सतरा प्रवासी जखमी


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- शिर्डी-हैदराबाद मार्गावरील शेरी (ता. आष्टी, जि. बीड) येथील पुलावर एसटी बस व कंटनेरची धडक बसून बसचालक व वाहकासह एकूण १७ प्रवासी जखमी झाले. हा अपघात २२ रोजी रात्री ९.३० च्या सुमारास झाला. जखमींमध्ये जामखेडमधील दोघांचा समावेश आहे. 
Loading...

बीड आगाराची बीड-पुणे (एमएच २० एसडी १७६१) बस व कंटनेरची (एमएच १२ एचडी २२४१) पुलावर धडक झाली. कंटनेर रस्त्यावर आडवा झाला. बस व कंटनेरचे मोठे नुकसान झाले. बसमध्ये पन्नासपेक्षा अधिक प्रवासी होते. 

जखमींवर आष्टी, कडा व नगर येथील खासगी रूग्णालयांत उपचार करण्यात आले. या घटनेचा आष्टी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.