मोदींनी मित्रों... म्हणताच खासदार दिलीप गांधी स्टेजवरच झोपले !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- पंतप्रधान नरेंद्र मोदीचं भाषण सुरू असताना अहमदनगरचे खासदार दिलीप गांधी झोप घेताना दिसले. सध्या सोशल मिडियावर त्यांचा झोप घेतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. 


Loading...
भर कार्यक्रमात किंवा स्टेजवर डुलक्या घेताना आपण अनेक राजकर्त्यांना पाहिले आहे. असाच एक व्हिडीओ नगरमध्ये व्हायरल झाला असून, यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण सुरू असतानाच खासदार दिलीप गांधी हे स्टेजवरच झोपल्याचे दिसत आहे.

 ‘आयुष्यमान’ या कार्यक्रमात घडलेल्या घटनेच्या या व्हिडीओची दिवसभर चर्चा सुरू होती. केंद्र सरकारच्या वतीने आयुष्यमान या योजनेचा रविवारी शुभारंभ करण्यात आला. प्रत्येक जिह्यात या कार्यक्रमाचे आयोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.


 नगर शहरात झालेल्या कार्यक्रमाला पालकमंत्री राम शिंदे, भाजपचे खासदार दिलीप गांधी, जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्यासह विविध पदाधिकारी मंचावर उपस्थित होते. ‘आयुष्यमान’ ही योजना काय आहे, याचे प्रास्ताविक झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण प्रसारित करण्यात येत होते.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
-------------------------------
Powered by Blogger.