बाजारभाव घसरल्याने कांदा उत्पादक अस्वस्थ.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- कांद्याला मातीमोल भाव मिळत असल्याने संतप्त शेतकऱ्यांनी कांदा रस्त्यावर फेकल्याचे वृत्त दूरचित्रवाणी वाहिनीवर येताच येथील कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये खळबळ उडाली. कांद्याच्या बाजारभावाला गेल्या २ महिन्यांपासून उतरती कळा लागली आहे. राज्यातील ६० कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये शुक्रवारच्या लिलावात १ नंबर कांद्याला ८०० ते १००० रुपये क्विंटलचा बाजारभाव मिळाला होता. 
Loading...

मात्र, या भावाने विक्री झालेल्या कांद्याची आवक नीचांकी होती. बहुतांशी बाजार समित्यांच्या मोंढ्यावर ८० टक्के कांदा दर्जानुसार १०० ते ६०० रुपये क्विंटलने विकला गेला. अवघ्या २० टक्के कांद्याला ८०० ते १००० रुपये क्विंटल भाव मिळाला. बाजारभाव वाढतील ही भाबडी अपेक्षा कांदा उत्पादक शेतकरी गेल्या दोन महिन्यांपासून बाळगून आहे. मात्र, बाजारभाव घसरल्याने शेतकऱ्यांच्या या अपेक्षा व्यर्थ ठरल्या आहेत. नगर, पुणे व नाशिक जिल्ह्यात शिल्लक कांद्याचे प्रमाण मोठे आहे. देशातील मागणी असलेल्या बहुतांशी राज्यात पुढील तीन महिने पुरवठा होईल एवढा कांदा शिल्लक आहे.

----------------------------

अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.