भाजप नगरसेवकाची महिला पदाधिकाऱ्याच्या पतीला मारहाण.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- नगरपालिकेतील भाजपचा नगरसेवक नानासाहेब कोथिंबिरे याने काही गुंडांना बरोबर घेऊन भाजप महिला आघाडी शहरप्रमुख जयश्री कोथिंबिरे यांचे पती भाजपचे युवक नेते बंडू कोथिंबिरे यांना घरात घुसून जबर मारहाण केली. याबाबतची तक्रार बंडू कोथिंबिरे यांनी पोलिस ठाण्यात दाखल केली आहे. नाना कोथिंबिरे याच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. १८ सप्टेंबरला सकाळी व्यायाम करण्यासाठी गेलेल्या बंडू कोथिंबिरे यांना रस्त्यात नानासाहेब कोथिंबिरे यांचा भाऊ अनिल भेटला. नानासाहेबला समजून सांग, तो दुसऱ्यांची कुटुंबे उद््ध्वस्त करत आहे, असे त्याला सांगताच अनिलला राग अनावर झाला. अनिलने भावाला हा प्रकार सांगितला. त्यानंतर नानासाहेब काही गुंडांना घेऊन बंडूच्या घरी गेला.

Loading...

त्याच्या घरात घुसून जबर मारहाण केली, शिवाय घरच्यांवर दडपशाही केली, असे फिर्यादीत म्हटले आहे. नानासाहेब दहा वर्षांपूर्वी मजुरी करत होता. सेंन्ट्रिग (बांधकाम) ठेकेदाराकडे अवघ्या ७० रुपये रोजाने तो काम करत होता. इतक्या कमी काळात त्याच्याकडे एवढी माया कशी जमा झाली? असा सवाल बंडू कोंथिंबिरे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केला. 


सत्तेचा गैरवापर करत त्याने अवैध मार्गाने हा पैसा जमा केला आहे, असेही त्यांचे म्हणणे आहे. नाना कोथिंबिरे निसर्ग नावाचे हॉटेल चालवतो. तेथे अवैध धंदे चालतात, असा आरोपही बंडू कोथिंबिरे यांनी केला. 

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.