नगर जिल्ह्यात स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव वाढू लागला, 22 दिवसांत 12 बळी.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-  गेल्या काही महिन्यांपासून जिल्ह्यात स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. अवघ्या 22 दिवसांत जिल्ह्यात 12 जणांचे बळी गेले असून, आरोग्य विभाग मात्र सुस्त आहे. जिल्ह्यातील 10 जणांचा जिल्ह्याबाहेर पुणे, नाशिक, औरंगाबाद जिल्ह्यात मृत्यू झाला असून दोन जण जिल्ह्यातील आहे. त्यामुळे आता जिल्ह्यातही स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव वाढू लागल्याचे दिसत आहे. 

Loading...

नगर जिल्ह्यातील वातावरणातील बदलामुळे स्वाइन फ्लूचे रुग्ण वाढले आहे. आतापर्यंत 16 रुग्ण आढळून आले असून त्यापैकी सात जणांचा बळी गेला आहे. 128 जणांवर उपचार सुरू असून त्यांना टॅमीफ्लूच्या गोळ्या देण्यात आल्या आहेत. 

गेल्या आठवड्यापर्यंत सात जणांचा मृत्यू झाला होता; परंतु या आठवड्यात आणखी पाच जणांचा मृत्यू झाल्याने स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे स्पष्ट होत आहे. नगरच्या शेजारील पुणे व नाशिक जिल्ह्यात स्वाइन फ्लूने थैमान घातले आहे. त्याचा परिणाम नगर जिल्ह्यावर होत आहे. 

स्वाइन फ्लूचा वाढता प्रादुर्भाव पाहून खासगी रुग्णालयांना उपचार करण्याचे अधिकार देण्यात आले असून टॅमीफ्लूच्या गोळ्या विकण्याचे अधिकार जिल्ह्यातील 20 औषध दुकानांना देण्यात आले आहेत. जिल्ह्यात संगमनेर, कोपरगाव व जामखेड तालुक्‍यातील प्रत्येकी तीन जणांचा तर श्रीगोंदे, नेवासे व कर्जत तालुक्‍यात प्रत्येकी एक जणाचा आतापर्यंत स्वाइन फ्लूने मृत्यू झाला आहे.
----------------------------अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.