करंजी घाटात ट्रक पालटल्याने दोघे जखमी.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- पाथर्डी तालूक्यातील करंजीघाट येथे शुक्रवारी सायंकाळी नगरकडून पाथर्डीकडे कागदी पुष्टयाचे बंडल घेवून जाणाऱ्या ट्रकचालकाचा ट्रकवरील ताबा सुटल्याने हा ट्रक उलटला. या अपघातामध्ये दोनजन जबर जखमी झाले आहेत. या घडलेल्या अपघातामध्ये ट्रकचालक मछिंद्र लक्ष्मण चाबूकस्वार व क्लीनर आकाश तुकाराम वाघमारे दोघे राहणार घोटन ता.शेवगाव येथील असल्याचे समजले. 
Loading...

अपघातानंतर महामार्ग पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी येवून जखमींना नगरला रवाना केले. रात्री उशिरा हा ट्रक महामार्गावरून बाजूला करण्यात आला. अपघातग्रस्त ट्रक रसत्यावरच पडल्यामुळे वाहनांची मोठी रांग घाटामध्ये लागली होती. यावेळी महामार्ग पोलीस सहायक फौजदार एस.वाय गोल्हार यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी रात्री बऱ्याच वेळ थांबून वाहतूक सुरळीत केली.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.