आजाराला कंटाळून निवृत्त पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- श्रीरामपूर रेल्वे स्थानका जवळ आजाराला कंटाळून एका निवृत्त पोलीस कर्मचाऱ्याने रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना काल पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास  घडली.
Loading...

 याबाबत श्रीरामपूर शहर पोलिसांनी सांगितलेली माहिती अशी, की येथील अशोक तुमाराम यशवंते (वय ५०, रा. संजयनगर, वॉर्ड नं. ७, श्रीरामपूर) यांनी आजाराला कंटाळून श्रीरामपूर रेल्वे स्थानक परिसरात रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केली. यशवंते हे पोलीस खात्यात सेवेस होते. 

आजारामुळे त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली होती. त्यांनी मृत्यूपूर्वी चिठ्ठी लिहून ठेवली होती. त्यात म्हटले आहे, की आजारामुळे खूप दुखत आहे, रात्रभर मी रडलो, जीव नकोसा झाला आहे. याप्रकरणी श्रीरामपूर रेल्वे स्थानकाचे उपस्टेशन प्रबंधक यांनी दिलेल्या खबरीनुसार शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. 
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.