आता गुटखा विकल्यास होणार तत्काळ अटक !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- गुटखा व पानमसाला विकणाऱ्यांवर आयपीसी अंतर्गत एफआयआर दाखल करण्यावर कोणताही प्रतिबंध नसल्याचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. राज्य सरकारने गुटखा विक्रीचा गुन्हा अजामीनपात्र व दखलपात्र करण्याचा निर्णय घेतल्याने गुटखा बंदीची प्रभावी अंमलबजावणी होणार आहे. 
Loading...

गुटखा विक्रेत्यांना गुटखा विक्री प्रकरणी तत्काळ अटक होणार असल्याने तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाच्या अनुषंगे गुटखाबंदीची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी राज्याच्या प्रशासनातील अधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक तत्त्वे तयार करणार असल्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री गिरीश बापट यांनी सांगितले आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.