नेवासा तालुक्यात स्वाईन फ्लूने शेतकऱ्याचा मृत्यू


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- नेवासा तालुक्यातील चिकणी खामगाव येथील शेतकरी सुखदेव बाबुराव खराडे (५०) यांचा स्वाईन फ्लूने मृत्यू झाला आहे. खराडे यांच्या मृत्युने तालुक्यात खळबळ उडाली आहे.

Loading...
सुखदेव बाबुराव खराडे यांना दिनांक ९ सप्टेंबरपासून सर्दी, ताप, खोकल्याचा त्रास होत होता. त्यांना प्रथमोपचार घेतल्यानंतर बरे वाटले नाही, मग त्यांनी वडाळा येथे उपचार घेतले. तेथेही त्यांना बरे वाटले नाही. त्यामुळे त्यांच्यावर अहमदनगर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. 

तेथे त्यांच्यावर उपचार सुरू होते. तेथे त्यांना स्वाईन फ्लू झाल्याचे निदान झाले. उपचार सुरु असतानाच त्यांचा अहमदनगरच्या खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. शुक्रवारी रात्री त्यांच्यावर शोकाकूल वातावरणात चिकणी खामगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात मुलगा, तीन मुली, पत्नी, भाऊ-भावजई असा परिवार आहे. 
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.