ढोल वाजवायचे बंद करा, माजीमंत्री पिचडांचे विरोधीपक्षनेते विखेंवर टीकास्र.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- निळवंडे धरणाच्या पाण्यावर पहिला हक्क अकोल्याचा आहे. हक्काच्या पाण्यासाठी रस्त्यावर उतरून आम्ही लढाई करू, असा एल्गार माजी मंत्री मधुकर पिचड यांनी केला. अगस्ती सहकारी साखर कारखान्याच्या गळिताचा प्रारंभ करताना शुक्रवारी ते बोलत होते. 
Loading...

कोणत्याही प्रकारचे योगदान नसतानाही निळवंडे धरणाचे काम आपल्यामुळेच झाले असल्याचे सांगत काही जण जनतेची दिशाभूल करत आपली पाठ थोपटून घेत आहेत. धरणाच्या निर्मितीसाठी थोडीफार संगमनेरकरांची मदत झाली. इतरांनी ढोल वाजवायचे बंद करावे, असे सांगत पिचड यांनी राधाकृष्ण विखे यांच्यावर टीकास्र सोडले. 

लोखंडी दरवाजाच्या दुरुस्तीची कामे पूर्ण करण्यात आली नसल्याने यावर्षी निळवंडेत पूर्ण क्षमतेने पाणी अडवण्यात जलसंपदा विभागाला अपयश आले. त्यामुळे उच्चस्तरीय कालव्यातून अकोल्याच्या शेतकऱ्यांना पाणी मिळाले नाही. यावर्षी पुरेसा पाऊस न झाल्याने खरीप हंगाम धोक्यात आला आहे. 

आढळा धरण भरलेले नाही. त्यामुळे अगस्तीच्या कार्यक्षेत्रातील ऊस विकासात अडचणी येत आहेत. अशातच जायकवाडी धरणात निळवंडेतून ४ हजार दलघफू पाणी सोडावे लागले, तर संपूर्ण निळवंडे धरणच रिकामे होईल, अशी भीती पिचड यांनी व्यक्त केली. 
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.