हलवाई दुकानांच्या जागेवरून राहुरी विरुध्द कोल्हार, बेलापूर वाद.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- राहुरी शहर आठवडे बाजारात हलवाई दुकानांच्या जागेवरून राहुरी विरुध्द कोल्हार, बेलापूर असा वाद उफाळून आला. या वादावर तोडगा काढण्यासाठी शुक्रवारी स्थानिक, तसेच कोल्हार व बेलापूरमधील व्यावसायिक नगर परिषदेच्या कार्यालयात आले. मात्र, मुख्याधिकाऱ्यांची भेट न झाल्याने तोडगा निघू शकला नाही. 
Loading...

एक दिवसाचा बाजार असल्याने सांभाळून घेण्याचा सल्ला देण्यात आल्याने प्रमुख बाजारपेठेतच आठवडे बाजार सुरू राहिला. आठवडे बाजारात कोल्हार, बेलापूर येथील १० हलवाई व्यावसायिकांची नूतन मराठी शाळेच्या दिशेला दुकाने आहेत, तर स्थानिक हलवाई दुकाने पूर्वीपासूनच नवीपेठेत आहेत. बाहेरच्या दुकानांमुळे स्थानिकांच्या व्यवसायावर परिणाम झाल्याचे कारण स्थानिक व्यावसायीकांकडून पुढे आल्याने वादाला खऱ्या अर्थाने तोंड फुटले आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.