सभापती प्रशांत गायकवाड यांचे सहीचे अधिकार काढले.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- पारनेर बाजार समितीचे सभापती प्रशांत गायकवाड यांचे सह्यांचे अधिकार काढण्यासाठी उपसभापती विलास झावरे यांनी शुक्रवारी सकाळी संचालकांची बैठक बोलावली होती. सुजित झावरे गटाचे सात, शिवसेनेचे तीन व काँग्रेसचा एक अशा अकरा संचालकांनी बहुमताने ठराव करून गायकवाड यांचे सह्यांचे अधिकार काढून घेतले. 
Loading...

सभापती गायकवाड, राष्ट्रवादीचे अण्णा बढे, मीरा वरखडे, शिवसेनेचे शिवाजी बेलकर, सावकार बुचुडे, लंके गटाच्या राजश्री शिंदे हे बैठकीस उपस्थित नव्हते. राष्ट्रवादीचे गंगाराम बेलकर, अरुण ठाणगे, हर्षल भंडारी, राहुल जाधव, सोपान कावरे, खंडू भाईक व विजय पवार, काँग्रेसचे उपसभापती विलास झावरे, सेनेचे काशिनाथ दाते, अशोक कटारिया व युवराज पाटील असे एकूण ११ संचालक हजर होते. 
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.