जामखेड तालुक्यात स्वाईन फ्ल्यूचा तिसरा बळी.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- जामखेड तालुक्यातील वंजारवाडी येथील रुपाली बाळासाहेब शिंदे (वय २०) या सात महिन्यांच्या गर्भवतीचा शुक्रवारी सकाळी नऊ वाजता नगर येथील खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. मागील तीन दिवसांत स्वाइन फ्लूने तिघांचा मृत्यू झाल्याने तालुक्यात घबराट पसरली आहे. 

Loading...
रुपाली शिंदे पुण्यात आपल्या कुटुंबीयांसमवेत रहात होती. गौरी-गणपतीसाठी ती गावी, वंजारवाडी येथे आली होती. सर्दी व खोकला झाल्याने तिला १५ सप्टेंबरला कर्जत येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. स्वाइन फ्लूची लक्षणे दिसल्याने तिला १७ रोजी नगर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. प्रकृती आणखी खालावत जाऊन तिचा शुक्रवारी पहाटे मृत्यू झाला.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.