जामखेडमधील शेतकऱ्यांना कुकडीचे पाणी मिळणार !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- कुकडी पाटबंधारे प्रकल्पाच्या ३९७७. ८५ कोटी रुपयांच्या सुधारित प्रशासकीय मान्यतेस मंत्रिमंडळाने मंजुरी दिली असून, या क्रांतीकारी निर्णयामुळे जामखेड तालुक्यातील चौंडी, दिघी, जवळा बंधारा, तुकाई व बिटकेवाडी या योजनांसाठी पाणी उपलब्ध होऊन शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. 
Loading...

तालुक्यातील शेतकऱ्यांनी या निर्णयाचे स्वागत केले असून, दुष्काळग्रस्त तालुक्याच्या दृष्टीने हा ऐतिहासिक निर्णय मानला जात आहे. पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांच्या पुढाकाराने काही महिन्यांपूर्वी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत जामखेड तालुक्यातील चौंडी, दिघी, जवळा बंधारे, पाटेवाडीसह इतर बंधाऱ्यांसाठी कुकडीचे पाणी उपलब्ध करून देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला होता. 


जलसंपदामंत्री महाजन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत पालकमंत्री शिंदे यांनी वरील बंधाऱ्यांचा समावेश कुकडी लाभक्षेत्रात करण्याची आग्रही मागणी केली होती. कर्जत-जामखेड या दुष्काळी तालुक्यांच्या दृष्टीने या कामांचे महत्व अधिक असल्याचे त्यांनी सांगितले. 

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.